Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा; खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

Nandurbar News : शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा; खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : भाववाढीच्या अपेक्षेने अनेकांच्या घरात गतवर्षीचा कापूस पडून असताना नवीन कापूस देखील येऊ लागला आहे. परंतु यंदा (Cotton Price) कापूस उत्पादन कमी असल्याने कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे (Nandurbar) नंदुरबार व शहादा बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प दिसून येत आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात अजून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाली नसली तरी नंदुरबार आणि शहादा बाजार समितीच्यावतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. बाजार समितीचा कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांच्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या आहे. कापसाच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी (Farmer) कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे. आठ दिवसापूर्वी सुरू झालेल्या कापूस खरेदी केंद्रात नंदुरबार बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर दहा हजार क्विंटल तर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर सात दिवसात सात हजार क्विंटल कापसाचे आवक झाली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाजार समितीमध्ये कापसाला प्रतवारीनुसार भाव मिळत असून ६ हजार ८५० ते ७ हजार ५०० पर्यंत कापसाला दर मिळत असल्याचे चित्र आहे. कापसाचे दर वाढतील असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात असल्याने बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT