Nandurbar News Farmer
Nandurbar News Farmer Saam tv
ऍग्रो वन

Special News : अंगठेबहाद्दर शेतकरी घेतोय ६ लाखांचे उत्पन्न; सातपुड्याच्या कुशीत फुलवली स्ट्रॉबेरी शेती

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : अलीकडे शेती परवडत नाही. आता शेतीत काही राहिलं नाही; अशा गोष्टी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात. पण अशा सगळ्या गोष्टींना फाटा देत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील कुशीत वसलेल्या डाब या गावातील एका अंगठा बहाद्दर शेतकरी कशा पद्धतीने स्ट्रॉबेरी शेतीतून लाखो रुपये कमावत आहे.

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील डाब या गावातील रहिवासी धिरसिंग फुसा पाडवी यांचे शिक्षण झालेले नाही. धिरसिंग हे अशिक्षित असून ते बालपणापासून कोणत्याच शाळेत शिकलेले नाहीत. पण त्यांनी जे प्रयोग आपल्या शेतीत केले. ते उच्चशिक्षितांना जमणार नाही आणि त्यातून एकेरी 6 लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत.

सुरवातीला खर्चही निघेना; हार मानली नाही

धिरसिंग हे आपल्या शेतात पारंपरिक पीक घेत होते. पण त्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याने २००७ पासून शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले. मात्र अपुऱ्या माहिती आणि योग्य नियोजना अभावी लागवडसाठी केलेला खर्च देखील त्यांचा निघत नव्हता. तरी त्यांनी हार न मानता आपला प्रयोग सुरू ठेवला. मग त्यांनी कृषी विभागाची मदत घेण्याच ठरवले. कृषी विभागाने माती परीक्षण करून स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक असल्याचं सांगत 2018 ला महाबळेश्वरला शेतकऱ्यांचा (Farmer) अभ्यास दौरा घेण्यात आला. त्यात त्यांना कशा पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करतात याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यंदा ६ लाख रूपये नफ्याची अपेक्षा

२०२१ साली त्यांनी एका एकरात १२ हजार स्ट्रॉबेरीचे रोप लावले असून १ लाख ५५ हजार एवढा लागवड खर्च आला. यातून त्‍यांना तीन टन उत्पन्न मिळाले. त्यात ४ लाख ५० हजार नफा त्यांना गेल्या वर्षी मिळाला. तर यावर्षी एका एकरात १२ हजार रोप लावले असून १ लाख ५५ हजार खर्च लागला आहे. यावर्षी ६ टन उत्पन्न निघणार असून ६ लाख रुपये नफा मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

गुजरातमध्‍ये निर्यात

स्ट्रॉबेरी पिकवण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक कुलिंग व्हेन, कोल्ड स्टोरेज, पेकेजिंग हाऊस, स्ट्रॉबेरी पॅकिंग करण्यासाठी बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा लाभ आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी घेत आहे. योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर धिरसिंगने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. पाण्याचा योग्य नियोजन करून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथील स्ट्रॉबेरी नंदूरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यात जात आहे. मालाचा दर्जा चांगला असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT