Anil Patil Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : दुष्काळी जिल्ह्यांच्या दुसऱ्या यादीसाठी लवकरच निर्णय; मंत्री अनिल पाटील यांची माहिती

Nandurbar News : लवकरच बैठक होणार असून सरकार गतिमान पद्धतीने निर्णय घेत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत देण्याचा प्रयत्न

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांच्या (Nandurbar) झालेल्या पंचनाम्यावरून राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता दुष्काळी (Drought) जिल्ह्यांच्या दुसऱ्या यादीसाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. (Latest Marathi News)

नंदुरबारच्या पालकमंत्री अनिल पाटील हे नंदुरबार दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत (Anil Patil) राज्यातील दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक होणार असून सरकार गतिमान पद्धतीने निर्णय घेत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत देण्याचा प्रयत्न करत असून मागील सरकारच्या काळापेक्षा या सरकारच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) लवकरच मदत मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विमा कंपन्यांकडून आग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात झाली असून दुष्काळी भागातील उपाययोजना सुरुवात झालेली आहे सरकारने अगोदर घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व मदती सरकारकडून दिल्या जाणारा असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबंध असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT