Kharif Season Saam tv
ऍग्रो वन

Kharif Season : यंदा खरीप हंगामात कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता; गतवर्षी शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : गतवर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. शिवाय कापसाचे जे उत्पादन मिळाले त्याला देखील अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. यामुळे यंदाच्या हंगामात कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. तसेच मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्यांच्या (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या परिस्थितीशी दोन हात करत शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतले. त्याला देखील समाधानकारक भाव मिळाला नसल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णतः वाया गेला होता. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या खरीप हंगामात (Kharif Season) कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्य पिकांवर असेल भर

कापसाची लागवड कमी करून शेतकरी अन्य पिकांवर भर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात प्रामुख्याने मका व सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर उदीड, मूग व नंदुरबार जिल्ह्यात भट शेती देखील केली जात असून याचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकण MIDC च्या विकासासाठी '३-स्तरीय' (Short, Mid, Long term) कृती आराखडा

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT