Nandurbar Rain Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Rain : दोन दिवसांच्या पावसाने शेतांना तलावाचे स्वरूप; पिकांचे मोठे नुकसान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने पिकं खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नंदुरबार व नवापूर या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पिकांवर मर येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिके हातात न जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

शेतकरी हवालदील 

सततच्या पावसामुळे (Rain) केळी, पपई, मिरची, कापूस आणि इतर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने पिके खराब होण्याचा अंदाज आहे. शिवाय अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT