Shahada News Saam TV
ऍग्रो वन

Nandurbar Weather: वादळी वाऱ्यामुळे ८३ हेक्टरला फटका; शहादा तालुक्यात केळी, पपई, फळबागांचे नुकसान

Nandurbar's Shahada Dustrict Rain Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, गोदीपूर, सुलतानपूर, सुलवाडा यासह एकूण १७ गावातील ९७ शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठं नुकसान झाले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील एकूण ८२.६५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या केळी, पपई, लिंबू यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, गोदीपूर, सुलतानपूर, सुलवाडा यासह एकूण १७ गावातील ९७ शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. प्रामुख्याने (Banana Crop) केळी, पपई आणि लिंबूच्या बागांना मोठा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आता काढणीवर होत्या. तसेच लिंबूचा देखील हंगाम सुरु असताना या बाग उध्वस्त झाल्या आहेत.  

दोन दिवस झालेल्या वादळी वारा व पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची बातमी 'साम टीव्ही'ने प्रसारित केली होती. यानंतर (Shahada) शहादा- तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी तात्काळ पंचनामी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची माहिती देखील आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT