Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : २१ वर्षे बंद होती बोअरवेल, अचानक ५० फूट उंच पाण्याचा फवारा उडला; घटनेमागचं रहस्य काय?

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आले होते. यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत देखील वाढ

Rajesh Sonwane

सागर निकवडे 

नंदुरबार : शेतात केलेली बोअरवेल पाण्याअभावी बंद पडली होती. यामुळे शेतकऱ्याने त्यावर दगड ठेवून हि बोअर बंद केली होती. साधारण २१ वर्षांपासून बंद असलेल्या या बोअरवेलमधून अचानक पाणी निघू लागले. पाहता पाहता पाण्याचा हा फवारा ५० फूट उंचापर्यंत उडू लागला होता. 

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील खोंडामळी गावातील हा प्रकार घडला असून या प्रकाराने सारेच अचंबित झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आले होते. यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. इतकेच नाही तर शेतशिवारात असलेल्या विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. चांगल्या पावसामुळे मधुकर सीताराम सावंत या शेतकऱ्याच्या (Farmer) शेतातील २१ वर्ष बंद असलेल्या बोअरवेलमधून पाण्याचे उंच फवारे निघू लागले आहेत. 

पाहण्यासाठी गर्दी 
पाणी नसल्याने शेतकरी मधुकर सावंत यांनी शेतात केलेली बोरवेल २१ वर्षापूर्वी दगड ठेवून बंद केली होती. यामुळे आपल्या बंद पडलेल्या बोरवेलमधून कधी पाणी येईल; अशी आशा देखील नव्हती. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर (Rain) पाऊस झाल्याने बंद पडलेल्या बोरवेलमधून ५० फूट उंच पाणी उडू लागले. बंद बोरवेलमधून अचानक पाणी निघाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT