Amravati News : २ तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आक्रोश; अचानक ट्रॅक्टर मोर्चा का काढला?

Amravati News : सततच्या अतिपावसाने संत्रा, मोसंबी पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या मुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान अद्याप मिळालेले नाही. यासारख्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाला आहे. या मागण्या मान्य कराव्यात यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढला तहसील कार्यालयावर आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.    

Amravati News
Navi Mumbai Crime : विक्रीसाठी आणलेल्या १२ लाखाच्या कुत्र्याचा मृत्यू; नुकसान भरून काढण्यासाठी भावाच्या घरात चोरी

सततच्या अतिपावसाने संत्रा, मोसंबी पिकांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या मुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Amravati) अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर संत्राची लागवड झाली असून अतिपावसामुळे एकूण लागवडीच्या आलेल्या बहराचे ८० टक्के पेक्षा जास्त संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत मिळावी; अशी (Farmer) शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

Amravati News
Shocking News : चॉकलेट चोरल्याचा फक्त संंशय आला, चिमुकल्याला दिली भयंकर शिक्षा, लेकराला बघून आई हादरली!

याशिवाय सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकरी सुद्धा अति पावसाने हवालदिल असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागलेल्या खर्चाच्या दुप्पट हमीभाव जाहीर करावा. मोर्शी वरुड तालुक्यात झालेल्या गारपिटीचे अनुदान जाहीर केले. मात्र ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मोर्शी उपविभागीय महसूल कार्यालयांवर शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com