नंदुरबार: महावितरण विभागाचा कारभार; शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देताच... दिनू गावित
ऍग्रो वन

नंदुरबार: महावितरण विभागाचा कारभार; शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देताच...

शेतकऱ्यांना वेठीस धरून महावितरण विभागाची उडवाउडवीची उत्तरे...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार: नवापुर Navapur तालुक्यातील करंजवेल, सुखवेल, आमलान या परिसरातील शेतकऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर महावितरण विभागाने MSEDCL झटका दिला आहे. वीज बिल Light Bill भरले नाही म्हणून महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सरळ ट्रान्सफर मधून वीज कनेक्शन बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.

हे देखील पहा-

वीज कनेक्शन बंद करण्याच्या आधी शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता वीज बंद करण्यात आल्याने भात पिकासह Rice Crop इतर पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या विहीर व बोरवेल द्वारे वीज पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी धडपड सुरू आहे.

नवापूर तालुक्यात प्रामुख्याने भात पिकाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, भात पिकाला दररोज पाणी द्यावे लागते. परंतु महावितरण विभागाने शेतकऱ्यांना वीज कनेक्शन बंद करून वेठीस धरल्याने भात पीक वाळत आहे. खरीप हंगामातील पीक काढणीला आल्यावर महावितरण विभागाने वीज कनेक्शन बंद केल्याने वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता असून महावितरण विभागाने केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. महावितरण विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना कधीच बिल देत नाही हे वास्तव आहे. थेट कार्यालयात येऊन बिल घेऊन भरणा करावा असा हुकूम अधिकारी देतात.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT