'Garbe Ki Raat': बिग बॉस-14 फेम राहुल वैद्यला जीवे मारण्याच्या धमक्या

या गाण्यामुळे मात्र सध्या राहुल वैद्य अडचणीत सापडल्याचे दिसुन आले आहे.
'Garbe Ki Raat': बिग बॉस-14 फेम राहुल वैद्यला जीवे मारण्याच्या धमक्या
'Garbe Ki Raat': बिग बॉस-14 फेम राहुल वैद्यला जीवे मारण्याच्या धमक्याSaam Tv
Published On

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम इंडियन आयडलमधून Indian Idol गायक राहुल वैद्य Rahul Vaidya लोकप्रिय झाला होता. तसेच तो मागील बिग बॉस 14च्या Big Boss Season 14 भागांमध्ये चमकल्याचे दिसून आले होते. राहुल वैद्य याने नुकतेच त्यांचे " गरबे की रात " Garbe Ki Raat हे गाणे रिलीज केले आहे, ज्यात " श्री मोगल माँ " गुजरातमधील अत्यंत आदरणीय देवीचा उल्लेख आहे. परंतु या गाण्यामुळे मात्र सध्या राहुल वैद्य अडचणीत सापडल्याचे दिसुन आले आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत.

हे देखील पहा-

त्याचे कारण त्यानं यु ट्युबवर You Tube एक व्हिडीओ शेअर केला आहे. गर्बे की रात अश्या नावंच ते गाणं आहे. या गाण्यासाठी त्याला त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. पण आता तोच व्हिडिओ वादाच्या भोवऱ्य़ात अडकला आहे. त्यात त्यानं श्री माँ मोगल देवी चा उल्लेख केला आहे. त्या व्हिडिओतून देवीची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला आहे.

राहुलला ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे आहे की,

राहुलला ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या व्हिडिओमध्ये त्याने देवी माँ ची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यातून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आता त्या गाण्यावर बंदी Song Ban घालण्यात आली आहे. वृत्तानुसार, देवीच्या भक्तांकडून राहुलला जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. त्या गाण्याचे नाव गर्बे की रात असे आहे. राहुल समवेत अभिनेत्री निया शर्माही Nia sharma या गाण्यात आहे. आहे.

'Garbe Ki Raat': बिग बॉस-14 फेम राहुल वैद्यला जीवे मारण्याच्या धमक्या
हिंगोलीत सलग दुस-या वर्षी 51 फुटी रावण दहन रद्द...

राहुलनं सांगितलं की...,

मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मला आलेले संदेश आणि फोन यातून अनेकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असे राहुलने सांगितले. इतकेच नाही तर राहुलच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही Police Complaint against Rahul Vaidya करण्यात आली आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल कडून भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. देवीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे... असे त्या पोलीस तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे अशी माहिती आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com