Turmeric Price Saam tv
ऍग्रो वन

Turmeric Price : हळदीला मिळाला आतापर्यंतचा सर्वाधिक दर; पाडव्याच्या मुहूर्तावर १४ हजार ९११ प्रति क्विंटल भाव

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातून हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणत असतात

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीला सर्वाधिक दर मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीची बाजार समितीमध्ये आवक वाढली असताना दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे १४ हजार ९११ रुपये प्रति क्विंटल इतका दर हळदीला मिळाला आहे. 

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातून हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणत असतात. बाजार समितीत नेहमी दहा ते बारा हजार हळदीचे पोते दाखल होतात. त्याची एका दिवशी मोजणी करण्यात येते. तर १६ जानेवारीपासून बाजार समितीमध्ये तेलंगणा राज्यातून हळदीची आवक सुरू झाली होती. सुरुवातीला २५ ते ३० कट्टे हळद विक्रीसाठी आणली जात होती. 

सुरवातीला दरात झाली घसरण 

यानंतर मात्र वाढ होत गेली. पहिल्या दिवशी १२ हजार ७११ रुपये हळदीला दर मिळाला होता. दीड ते दोन महिने ही आवक सुरू होती. फेब्रुवारी अखेरीस स्थानिक हळदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सरासरी १२ हजार १०० रुपये क्विंटलला दर मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून एक हजाराने हळदीच्या दरात घसरण होत गेली. दरम्यान यंदा १५ ते २० टक्क्यांनी हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु मधल्या काळात हळद पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव आणि उत्पादनावर परिणाम झाला. उत्पादन घटल्याने भाव चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांना अशा होती. परंतु दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

पाडव्याला मिळाला चांगला दर 

तेलंगणातील हळदीमुळे व्यापाऱ्यांना जेवढा भाव पाहिजे तेवढा मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी ही कमी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत क्विंटलला चार हजार रुपये कमी भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा व्येक्त होत आहे. दरम्यान पाडव्याच्या मुहूर्तावर १४ हजार ९११ रुपये इतका दर क्विंटलला मिळाला आहे. हा दर कायम राहिल्यास किंवा हळदीच्या दरात वाढ झाल्यास शेतकऱ्यांची हळद हसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

PNB Scam: मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; तुरुंगात मिळणार तब्बल १४ सुविधा

SCROLL FOR NEXT