Soyabean Purchase Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Purchase : सोयाबीन खरेदीचा अंतिम दिवस; नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा, मुदत वाढविण्याची होतेय मागणी

Nanded News : पाच दिवस सोयाबीन घेऊन आलेले वाहने एकाच जागी उभे असल्याने वाहणाच्या भाड्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आता सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नाफेडद्वारे हमीभावाने खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनची आज शेवटची तारीख आहे. मुदत संपणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर सोयाबीन आणल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. नांदेडसह अमरावती, वाशीम जिल्ह्यातील खरेदी केंद्रांबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या असून सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

नांदेडच्या अर्धापूर येथील नाफेड केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. पाच दिवसापासून शेतकरी खरेदी केंद्रावर मुक्कामी आहेत. शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. तर दुसरीकडे पाच दिवस सोयाबीन घेऊन आलेले वाहने एकाच जागी उभे असल्याने वाहणाच्या भाड्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आता सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

मुदतवाढीचा होतेय मागणी 

आता मुदत वाढ मिळाली नाहीतर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कमी भावाने खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोयाबीन खरेदीची मुदत वाढून देण्यात यावी; अशी शेतकरी वर्गातून होत आहे. दोऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांनी खरेदीची मुदत वाढून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

वाशिममध्येही खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा..
वाशीम
: शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत सोयाबीन खरेदी सुरू केली. मात्र, या खरेदीचा मुदतवाढीचा आजचा शेवटचा दिवस आहे. अजूनही वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी बाकी आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन मोजून घेण्यासाठी वाशिमच्या राजगाव खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच नोंदणी असलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळेल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. 

अमरावती जिल्ह्यातही तीच परिस्थिती 

नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अमरावती जिल्ह्यात देखील नाफेड केंद्रांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबिन खरेदी विना पडून आहे. यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी केली जात आहे. नाफेडमध्ये सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असून खाजगी बाजार पेठेमध्ये ३ हजार ५०० पर्यत भाव आहे. यामुळे सोयाबीन खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT