Onion, Nafed
Onion, Nafed  Saam Tv
ऍग्रो वन

Nashik News : शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! NAFED करणार कांद्याची खरेदी, नाशकात नियाेजनास प्रारंभ

अभिजीत सोनावणे

Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत नाफेडकडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) नाशिक (nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (purchasing of onion) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने यावर्षी नाफेडतर्फे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ या दोन नोडल एजन्सी मार्फत कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे असल्याचे समजते.

देवळा तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोडावून तपासणीसह टॅगिंगच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात कांद्याला भाव मिळत नसल्यानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची शक्यता! पुढचे 3 दिवस अवकाळीसह गारपीट होण्याचाही अंदाज

Priyanka Gandhi: प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल

Shirur Lok Sabha: पाऊस आला, पण अजित पवार उठून न जाता भाषण ऐकत थांबले!

Video: प्रियंका गांधी येताच एकच गर्दी झाल्यानं पोलिसांचीही उडाली तारांबळ! नेमकं घडलं तरी काय?

Udayanraje Bhosale In Beed : बीडमध्ये उदयनराजेंचीच हवा,पंकजा मुंडेसाठी घेतल्या हेलिकॉप्टरने प्रवास करत 3 सभा

SCROLL FOR NEXT