दोन महिने झाले, तरी दूधदरात अद्याप वाढ नाही  Saam Tv
ऍग्रो वन

दोन महिने झाले, तरी दूधदरात अद्याप वाढ नाही

दुधाला हमी भाव देण्यासह तातडीने उपाययोजना करण्याबाबत दुग्धविकास मंत्र्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते, दूध संघाचे प्रतिनिधी यांची बैठक आज पार पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नगर : दुधाला Milk हमी भाव Guaranteed price देण्यासह तातडीने उपाययोजना करण्याबाबत दुग्धविकास Dairy development मंत्र्यासोबत शेतकरी Farmers संघटनेचे नेते, दूध संघाचे प्रतिनिधी यांची बैठक आज पार पडली आहे. मंत्र्यांनी ८ दिवसांमध्ये तोडगा काढून दरवाढ करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. मात्र, २ महिने झाले आहे, तरी दर वाढले नाही.

सध्या दुधाला २२ ते २३ रुपये दर मिळत आहे. पशुखाद्याचे दर वाढले असतानाच दुधाचा भाव वाढत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. १ लिटर दूध उत्पादनाकरिता सध्या २८ ते ३० रुपये खर्च येत असल्यामुळे नफा नव्हे तर सध्याच्या भावानुसार ५ रुपयांचा तोटा Loss सोसावा लागत असल्यामुळे दूध उत्पादक सांगत आहे.

हे देखील पहा-

राज्यामध्ये साधारण १ कोटी ४० लाख लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे संकलन होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये मागील दीड वर्षापासून दुधाचे भाव अस्थिर आहेत. मागणी नसल्यामुळे सांगत दूध संघांनी भाव घटविले आहे. वर्षभरात २ महिने चांगले भाव मिळाल्यावर पुन्हा ४ महिन्यापासून भाववाढ कपात करत ३२ रुपयांचा दर २० रुपयांवर आलेला आहे.

दुधाला भाववाढ दिला जात नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संषर्घ समिती आणि विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारल्यानंतर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह माजीमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, महानंदचे अध्यक्ष उदयसिंह देशमुख, शरद जोशी विचारमंचचे विठ्ठल पवार, शेतकरी नेते धनंजय धोरडे यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी आणि दूध संघाचे चालक यांची बैठक आज पार पडली आहे.

त्या ८ दिवसांत दूध वाढीचा तोडगा काढू आणि दुधाला एफआरपी FRP देण्याबाबत तातडीने विचार करु, असे आश्‍वासन देण्यात आले आहे. मात्र २ महिने होत आले तरी देखील दूध दरात फारसा बदल झालेला नाही. लॉकडाउन LockDown उघडले आहे, तरी देखील राज्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु होऊन महिना झालेला आहे. तरी देखील दुधाचे भाववाढ वाढवले जात नाही. उलट पशुखाद्याचे भाव हे वरचेवर वाढत आहेत. यामुळे सध्या मिळणारा भावाचा विचार करता नफा नव्हे, तर राज्यामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कष्ट करुनही ७ ते ८ कोटी रुपये रोजच फटका सध्या सोसावा लागत आहे.

Edited By- digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

SCROLL FOR NEXT