Masale 
ऍग्रो वन

अमेरिकेत ज्याची चर्चा, तो मेघालयचा मसाला आता तुमच्या दारात; जाणून घ्या काय आहे खास

मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे आयोजित मेघालय स्पाइस फेस्टिव्हलमध्ये राज्यातील सेंद्रिय हळद, आले आणि इतर मसाल्यांचे भव्य प्रदर्शन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निसर्गाचा वरदान लाभलेला प्रदेश आणि तिथल्या मातीचा अस्सल कस! जेव्हा मेघालयचे शुद्ध मसाले मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात येतात, तेव्हा एक वेगळाच उत्सव साजरा होतो. मुंबईतील मुंबईमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘मेघालय स्पाइस फेस्टिव्हल’चे आयोजित करण्यात आले होते. मेघालय राज्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या सेंद्रिय मसाला अर्थव्यवस्था पाहायला मिळाली. शेतकरी, उद्योजक, सहकारी संस्थांचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी अशा १४० सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने मेघालयहून मुंबईत येऊन खरेदीदारांशी थेट संवाद साधला.

उद्घाटनाच्या दिवशी मोठी गर्दी, खरेदीदार-विक्रेता यांच्यात सातत्यपूर्ण संवाद तसेच मसाले आणि पर्यटन क्षेत्रातील संरचित बी२जी (बिजनेस-टू-गव्हर्नमेंट) बैठका पार पडल्या. ‘मेघालयच्या सेंद्रिय मसाला परिसंस्थेतील संधी’ या विषयावरील उच्चस्तरीय मंचाने धोरणात्मक चर्चेला दिशा दिली. प्रत्यक्ष प्रक्रिया प्रात्यक्षिके, चव चाखण्याचे काउंटर आणि विशेष रिटेल प्रदर्शनांमुळे संपूर्ण स्थळ एका सक्रिय बाजारपेठेत रूपांतरित झाले. खरेदी करार, निर्यात चौकशी आणि भागीदारीविषयी चर्चा दिवसभर सुरू राहिल्या, ज्यातून गंभीर व्यावसायिक रस दिसून आला.

मेघालय स्पाइस फेस्टिव्हलचा उद्देश राज्यातील उच्च दर्जाच्या सेंद्रिय मसाल्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पहिल्याच आवृत्तीत मुंबईसह देश-विदेशातील खरेदीदारांचे लक्ष वेधण्यात यश आले आहे. भारताची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईत हा महोत्सव आयोजित करून मेघालय सरकारने आपल्या मसाल्यांना प्रीमियम देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा स्पष्ट प्रयत्न दर्शविला आहे. तसेच या वाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत व्हावा, यासाठी हा महोत्सव राज्यातील शेतकरी आणि मसाला उद्योजकांना राष्ट्रीय किरकोळ विक्रेते, संस्थात्मक खरेदीदार आणि जागतिक निर्यातदारांशी जोडणारे एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून संकल्पित करण्यात आला आहे.

मेघालय सरकारचे मुख्य सचिव डॉ. शकील पी. अहमद, आयएएस यांनी राज्याच्या कृषी पायाभूत व्यवस्थेची प्रामाणिकता अधोरेखित करत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना उत्पादकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. मेघालय सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे आयुक्त व सचिव डॉ. विजय कुमार डी., आयएएस यांनी राज्याच्या वाढत्या बाजारपेठीय उपस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की मेघालयची हळद सध्या देशांतर्गत बाजारपेठेसोबतच अमेरिका, मध्यपूर्व आणि युरोपमध्येही पोहोचली आहे, तसेच यंदा आल्याची निर्यात सिंगापूरला करण्यात आली आहे. शाश्वत भागीदारीवर भर देत ते म्हणाले, “आम्हाला शाश्वत शेतीवर विश्वास ठेवणारे खरेदीदार हवे आहेत. आमची उत्पादने योग्य बाजारपेठेत नेऊन शेतकऱ्यांना योग्य दर देणारे भागीदार आम्हाला हवे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

Palak Paneer Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पालक पनीर रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

वंशाचा दिवा मुलगाच हा समज खोटा, विज्ञानाने दिला धक्का; आईकडूनच पुढे जातो खरा DNA

Keratin vs Hair Botox: केराटिन आणि हेअर बोटॉक्समध्ये नेमका काय फरक? केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

SCROLL FOR NEXT