भंडारा : भंडारा जिल्ह्यातील 18 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले तर सात केंद्रांची विक्री खत विक्रीत अनियमितता त्यांना भोवली आहे कारण कृषी विभागाने सुरु केलेल्या धडक मोहीमेत ही कृषी सेवा केंद्र सापडली आहे दरम्यान कृषी विभागाच्या या कारवाई मुळे कृषी सेवा केंद्र संचालकात मात्र खळबळ सुरु झाली असून आतापर्यंतची कृषी विभागाची मोठी कारवाई असल्याच मानल जात आहे.Major action taken by the Department of Agriculture against those who stockpile chemical fertilizers
हे देखील पहा-
भंडाराBhandara जिल्ह्यात शेतकऱ्यांना पुरवठा करणाऱ्या रासायनिक खताच्या विक्रीत अनियमितता करून साठेबाजी करणाऱ्या जिल्ह्यातील 18 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले तर सात केंद्रांची विक्री बंद केल्याची कृषी विभागाने धडक कारवाई केली. निलंबित करण्यात करण्यात आलेल्या परवान्यामध्ये पवनी तालुक्यातील नऊ,मोहाडी तालुक्यातील पाच आणि तुमसर तालुक्यातील चार केंद्रांचा समावेश आहे. या कृषी विभागाच्या धडक कारवाई कृषी सेवा केंद्र संचालकातDirector मोठी खळबळ माजली आहे.
भंडारा जिल्ह्यात सर्व प्रकारची खते पुरेशा प्रमाणात आहेत.मात्र काही कृषी केंद्रातIn the agricultural center खतविक्रीत अनियमितता दिसून आल्याने कृषी विभागाने धडक मोहीम राबविली. या धडक मोहीमेत युरीयाची विक्रीSale of urea पास मशिनवर करण्यात येत नसल्याचे दिसून आले तर खताची नोंद विक्री पुस्तकावर न घेता,विक्री साठा, दर, फलक अद्यावत नसल्याचे दिसून आले. त्यावरून खत विक्रीत अनियमितता आढळून आल्यामुळे कृषी विभागाने 18 कृषी केंद्राचे परवाने रद्दLicense revoked केले तर 7 केद्रांची विक्री बंद केली केली आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.