ishwar bhusari 
ऍग्रो वन

४० हजार रूपये भरण्यासाठी नसल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

या प्रकरणाचा पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा : विद्युत बिलाचे देय भरण्यासाठी पैसे नसल्याने भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातिल तावशी येथे एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन शेतक-याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्या असून अधिक तपास करीत आहाेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

कृषि पंपाच्या थकीत विज बिलासह घरगुती विजेच्या बिलाचा भरणा करणे शक्य झाले नसल्याने आलेल्या विवंचनेतून युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे घडली आहे. ईश्वर काशीराम भुसारी (वय ३८) असे मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

ईश्वर ह्यांच्या मालकीच्या शेतात कृषि पंप असून राहत्या घरी देखील वीज जाेडणी आहे. त्यांच्यावर कृषि पंपाच्या थकित विज बिलासह घरगुती विजेच्या बिलाचे ४० हजार रूपये थकले आहे. बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने काही दिवसांपासून ते तणावात होते. अखेर आर्थिक विवंचनेतुन घरामागील पळसाच्या झाडाला इलेक्ट्रिक वायरने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ह्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ईश्वर ishwar bhusari यांच्या अचानक जाण्याने तावशी गावात शोककळा पसरली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT