कमी पावसामुळे शेती पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता Saam Tv
ऍग्रो वन

कमी पावसामुळे शेती पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात पावसाची समाधानकारक हजेरी होती.

दिनू गावित

नंदुरबार - राज्यातील इतर भागात अतिवृष्टी असली तरी नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात सरासरी 45 टक्के कमी पाऊस Rain झाल्याने शेती Farm पीक व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात पावसाची समाधानकारक हजेरी होती.

यंदा मात्र जून च्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी 167. 3 मिलिमीटरच पाऊस झाल्याने सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 39.6 टक्केच पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांच्या उत्पादनावर व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा -

राज्याच्या इतर विभागात अतिवृष्टी झाली असली तरी नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पाऊस लांबत गेल्याने आज अखेरीस जिल्ह्यात केवळ 39.6 टक्केच पाऊस झालेला आहे त्यामुळे सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू असुन पुढील दोन ते तीन दिवस पावसाची ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर पुढचे पंधरा दिवस पाऊस कमी असण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा लक्षात घेता कमी पाण्यावर येणारे बाजरी, तूर, सूर्यफूल पिकांची निवड करून आंतरपीक पद्धतीने लागवड करावी असे आवाहन केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाळा सुरू राहतो. येत्या काही दिवसात पावसाची टक्केवारी वाढेल असा अंदाज असला तरी नद्यांच्या उगमस्थानी दमदार पाऊस झाला नसल्यामुळे जिल्ह्यातील 36 लघु प्रकल्पांपैकी बारा प्रकल्पांमध्ये चाळीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.

सप्टेंबर अखेर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप हंगामातील शेती पिकांच्या उत्पादनावर व उन्हाळ्यातील शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यावरून मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तापी नदी वगळता इतर नद्या कोरड्या ठाक असून पहिल्या पुराच्या प्रतीक्षेत आहे. गेल्यावर्षी जुलैपर्यंत जिल्ह्यातील अनेक प्रकल्प 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाले होते. परंतु यंदा जुलै महिना संपत येऊनही दमदार पाऊस नसल्याने लघु व मध्यम प्रकल्पांची पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा लागून आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Manoj Jarange: जीआर फक्त निमित्त, काहीतरी मोठा डाव शिजतोय; मनोज जरांगेंना संशय

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: हिंगोलीत निघाला बंजारा समाजाचा मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

SCROLL FOR NEXT