grapes, sangli, solapur saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain In Maharashtra : अवकाळीचा सांगलीसह बार्शीतील द्राक्ष बागांना फटका; लाखाेंची गुंतवणूक मातीमोल

प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून न्याय देण्याची मागणी.

Siddharth Latkar

- विजय पाटील, विश्वभूषण लिमये

Unseasonal Rain In Maharashtra News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमरास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे साेलापूर आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत. (Maharashtra News)

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने हजेरी (Unseasonal Rain In Solapur) लावली. शेलगाव गावात द्राक्षाची बाग अक्षरशा खच पडला आहे.

यामुळे द्राक्ष बागायतदारांवर मोठी संकट उभे राहिले आहे. हाततोंडाची आलेली द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. देविदास शिंदे यांची पाऊण एकर द्राक्षाची उभी बाग आडवी झाली. त्यांचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकरी योगेश शिंदे यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यात देखील सर्वत्र कमी अधिक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा शिल्लक आहेत तेथे जास्त नुकसान झाले आहे. शिवाय रॅक वरील बेदाणा बनवण्यासाठी टाकलेल्या द्राक्षांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसल्याने सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा नंदकुमार धाबुगडे (द्राक्ष उत्पादक शेतकरी) तसेच सुनील धाबुगडे यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT