Latur Mahavitaran Saam tv
ऍग्रो वन

Latur News: ११ हजार ६६६ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; महावितरण अँक्शन मोडवर

११ हजार ६६६ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; महावितरण अँक्शन मोडवर

दीपक क्षीरसागर

लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडळातील (Beed) बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ४९२ शेतकऱ्यांकडे ५ हजार ८७९ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण (MSEDCL) वसुलीसाठी अँक्शन मोडवर आले असून थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. (Maharashtra News)

यंदा समाधानकारक पाऊस (Rain) झालेला असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढणार असून विजेची खरेदी, आवश्यक दुरुस्तींसाठी थकीत बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. लातूर (Latur) परिमंडळात ११ हजार ६६६ कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकित बिलासाठी विशेष मोहीम सुरू असून, सूचना देऊनही बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

थकबाकी वाढली

महावितरणच्यावतीने कृषिपंपांना वर्षातून तीन बिले दिली जातात. यामध्ये एकही बिल न भरल्याने थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरणतर्फे थकीत बिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. ज्या कृषिपंपधारकांकडे थकबाकी आहे. त्यांनी भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

SCROLL FOR NEXT