Cyber Crime: महिला वकिलास 20 हजारांचा गंडा; क्रेडीटकार्डचा ओटीपी मिळवून महिलेला ५० हजारात लूटले

महिला वकिलास 20 हजारांचा गंडा; क्रेडीटकार्डचा ओटीपी मिळवून महिलेला ५० हजारात लूटले
Cyber Crime News
Cyber Crime NewsSaam tv
Published On

जळगाव : लाईट बिल अपडेट करण्याच्या नावाखाली गजानन कॉलनीतील शांतीबनअपार्टमेंट येथील महिला वकिलास२० हजारात ऑनलाईन गंडा (Cyber Crime) घातल्याची घटना घडली. तर, दुसऱ्या एका घटनेत (Bank) बँकेच्या क्रेडीट कार्डचा ओटीपी नंबर मिळवुन वाघनगरातील गृहीणीस ५० हजार ७७४ रुपयात गंडविण्यात आले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Cyber Crime News
Crime News: पोटच्या मुलीवर अतिप्रसंग; नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव (Jalgaon) शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमध्ये शिरीन गुलामअली अमरेलीवाला या महिला वकील वास्तव्यास आहेत. १७ नोव्‍हेंबरला दुपारी शिरीन यांच्या मोबाईलवर तुमचे लाईटबिल अपडेट नसून तुमची लाईट कट करण्यात येईल; असा मॅसेज आला. तसेच त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर तात्काळ कॉल केला. मात्र, त्यांचा कॉल कोणीही रिसीव्ह केला नाही.

ॲप डाउनलोड केले अन्‌

दुसऱ्या दिवशी (१८ नोव्‍हेंबर) सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना पुन्हा विद्युत विभागातून (MSEDCL) फोन आला असता, अमरेलीवाला यांनी त्याला मी लाईट बील भरले असून तुम्ही मला परत का सांगत आहे. अशी विचारणा केली. त्यावर समोरील व्यक्तीने नवीन नियमानुसार तुम्हाला तुमचे बिल अपडेट करावे लागेल, असे त्याने सांगितले. त्यानुसार समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे अमरेलीवाला यांनी मोबाईल ॲप्लीकेशन (QUICK SUPPORT APP) लाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या बँकेची संपुर्ण माहिती त्यामध्ये भरायला लावून दोन वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण २० हजारांची ऑनलाईन रक्कम परस्पर वळती करुन घेण्यात आली.

क्रेडीट कार्डच्‍या नंबरद्वारे गृहीणीची फसवणुक

शहरातील वाघनगरातील रहिवासी अश्विनी जयेश सावकारे (वय ३५) यांना मंगळावार (ता.१५) नोव्हेंबर रोजी अज्ञात महीलेने (८४४८४६९४१४) या मोबाईल फोन द्वारे संपर्क करत एक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यनंतर विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी प्राप्त करुन घेतला. यानंतर सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच जळगाव सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पेालिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com