पाऊस नव्हे इथं आसवांचा पूर; अवघं पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल
पाऊस नव्हे इथं आसवांचा पूर; अवघं पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल Saam TV
ऍग्रो वन

पाऊस नव्हे इथं आसवांचा पूर; अवघं पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल

दीपक क्षीरसागर

लातूर: गत दोन तीन दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून मांजरा तेरणा ही धरणं काठोकाठ भरली आहेत. यामुळे दरवाजे उघडली आहेत तर, दुसरीकडे पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रातील सोयाबीन पाण्याखाली गेलं आहे. यामुळे गरिबीत जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता आसवांचा महापूर दिसत आहे. हाती येत असलेलं सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं जगावं कसं हा प्रश्न समोर आहे. लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प यावर्षी काठोकाठ भरली असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे नदीकाठच्या शेतात अक्षरशः पाण्याचा महापूर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे, तर गेल्या 3 दिवसापासून सतत पावसानं जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने 75 टक्के पेक्षा जास्त सोयाबीनचे क्षेत्र पाण्याखाली गेलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लातूर जिल्ह्यात मांजरा तेरणा रेना मन्याड तिरु तावरजा आदी नद्यांना पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील औसा देवणी निलंगा उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर रेणापूर लातूर शिरूर अनंतपाळ आदी तालुक्यात सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. तर अनेक शेतात सोयाबीनला पाणी लागल्याने हाती येणार चार पैसे पाण्यात गेले आहेत. लातूर जिल्ह्यात सरासरी 6 लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. अद्यापही 80 टक्के शेतात सोयाबीन उभं आहे. दरम्यान पावसानं होत्याच नव्हतं अशी स्थिती निर्माण केली आहे.

जुलै ऑगस्ट महिन्यात पावसानं काही प्रमाणात ओढ दिली होती. पण आता पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याचा परिणाम उशिरा पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे नगदी पीक असून राज्यात सोयाबीन उत्पादनात अग्रेसर जिल्हा अशी ओळख आहे .ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे अश्यांनी 72 तासात विमा कंपनीला तात्काळ माहिती द्यायची असे आदेश दिलेले आहेत पण अँप चालत नसल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे, यासाठी शासनाने तातडीची मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT