पावसाचा अभाव त्यानंतर अतिवृष्टी; सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात! दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

पावसाचा अभाव त्यानंतर अतिवृष्टी; सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात!

सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: जिल्ह्यात सोयाबीन Soybean पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात. मात्र यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली. त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं. याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत. यामुळं शेतकरी आता संकटात सापडला आहे.

हे देखील पहा-

लांब लांब पर्यंत हिरवं गार आणि बहरलेलं हे सोयाबीनचं पीक आहे लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा या गावातलं. लांबून पाहिलं तर हे पीक खूप उत्पन्न देणार असं सहजंच वाटेल, मात्र याच्या शेंगा पहिल्या तर लगेच हा भ्रम दूर होईल. या सोयाबीनला शेंगा आहेत, मात्र अतिवृष्टीमुळं यात दाणेभरणीच झाली नाही.

जवळपास तिनशे एकरावरील सोयाबीनची हीच परिस्थिती आहे. एकाच गावाची ही परिस्थिती नसून ईथुन जवळच असलेल्या साकोळ गावातल्या शेतकऱ्यांची देखील हीच अवस्था आहे. या गावातल्या शेतकऱ्यांना देखील हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीन वाया गेलंय असं आक्रोश शेतकरी करत आहेत.

मात्र सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करून आपले हाथ वर केलेत. अतिवृष्टीमुळं वाया गेलेल्या या सोयाबीनचा पंचनामा करून तात्काळ मदत अथवा पीकविमा मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र सरकारी कार्यालयात बसून सरकारी बाबूंनी या शेतकऱ्यांचं भविष्य लालफितीत अडकवलंय. आता प्रशासनाला जाग कधी येणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT