Visva Bharati University  Careers360
ऍग्रो वन

Agriculture News: व्वा हे भारीय! विश्वभारतीने शोधलाय नवा बॅक्टेरिआ; पिकांच्या वाढीसाठी करणार मदत

Visva Bharati University : विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधनाचे नेतृत्व करणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ बोम्बा दाम म्हणाले की, हा बॅक्टेरिआ शेतीचा खर्च कमी करेल. खतांचा वापर कमी करण्यास हा बॅक्टेरिआ शेतकऱ्यांना मदत करेल.

Bharat Jadhav

Visva Bharati University Bacteria:

शेती क्षेत्राला लाभदायक ठरेल असं संशोधन विश्व-भारती विद्यापीठाने लावलाय. या विद्यापीठाच्या वनस्पस्तीशास्त्र विभागातील संशोधकांनी वनस्पतींच्या वाढीला चालना देणारा एक बॅक्टेरिआ शोधला जो पिके नष्ट करण्याऐवजी पिके वाढवण्यासाठी मदत करेल. (Latest News)

विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे (Department of Botany) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) बोम्बा दाम यांच्या नेतृत्त्वातील टीमने या बॅक्टेरिआचा शोध लावलाय. दाम यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बॉक्टेरिआमध्ये कृषी पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. या बॉक्टेरिआला (Bacteria) ‘पेंटोइया टॅगोरी’असं नाव देण्यात आलंय. दाम यांच्या संशोधन टीममध्ये राजू बिस्वास, अभिजीत मिश्रा, अभिनव चक्रवर्ती, पूजा मुखोपाध्याय आणि संदीप घोष याचा सहभाग आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतनमध्ये बोलताना दाम म्हणाले की, हा बॉक्टेरिआ वनस्पतींच्या वाढीला चालना देणारा असून याच्यामुळे कृषी क्षेत्रात (agriculture sector) क्रांती होई. "या बॉक्टेरिआने भात, वाटाणा आणि मिरचीच्या लागवडीला चालना उत्तम आहे.

दाम यांच्या टीमने शांतीनिकेतनमधील सोनाझुरी येथील मातीतून बॅक्टेरिआ वेगळा केला. नंतर आम्हाला झारखंडमधील झरिया कोळसा खाणीच्या पट्ट्यात बॅक्टेरिआ आढळले. पेंटोइया टॅगोरी बॅक्टेरिआ मातीतून पोटॅशियम कार्यक्षमतेने बाहेर काढते, ज्यामुळे वनस्पतींची वाढ वाढते. झारिया कोळसा खाणींच्या (Zaria Coal Mines) मातीत आढळणारे बॅक्टेरिआ पोटॅशियम आणि फॉस्फरसचे विद्राव्य म्हणजे ते एकत्रित करतात.

नायट्रोजनची पातळी योग्य करण्यास हा बॅक्टेरिआ मदत करतो, ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीस मदत होते. हे बॅक्टेरिआ व्यावसायिक खतांचा म्हणजेच युरिया आदी खतांचा वापर कमी करण्यास मदत करेल. यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यास आणि पीक उत्पादनास चालना देण्यास मदत होईल. दाम म्हणाले की, असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडियाने (एएमआय) या शोधाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यांचे निष्कर्ष ‘इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी’मध्येही प्रसिद्ध झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT