Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : मुरमाड शेतजमिनीतून ऊसाचे विक्रमी उत्पादन; आधुनिक पद्धतीने केली मशागत

Kolhapur news : पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करत शेतात उसाची लागण केली

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : आजही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करत असतात. मात्र या पारंपरिक शेतीला फाटा देत काहीजण वेगळा प्रयोग करून यात यशस्वी होतात. अशाच प्रकारे बदलत्या हवामानात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीवर मात करत कोल्हापुरच्या शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केली. इतकेच नाही तर या शेतकऱ्याने प्रतीगुंठा विक्रमी उत्पादन घेतले आहे. कोल्हापुरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत असून त्यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

कोल्हापुरातील (Kolhapur) लाटवडे गावतील उद्योजक शंकर पाटील यांनी मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याचे काम केले आहे. शंकर पाटील यांचे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गाव आहे. पेठवडगाव येथे पाटील यांची शेती आहे. पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने (Sugarcane) ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करत शेतात उसाची लागण केली. 

शंकर पाटील यांनी जुलैमध्ये ८६०३२ या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लावण केली. मुरमाड शेत जमिनीत उगवणही उत्तम झाली. नुसतीच लागण केली नाही तर त्याचे योग्य नियोजन करत खत, पाणी देण्याचे काम केले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात नाही, असा ऊस शेतात दिसू लागला. एकरी ४२ हजार ऊस राहावेत, यासाठी अतिरिक्त ऊस काढून उसाची संख्या मोजून घेतली. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घातल्याने पाटील यांना एकरी १२० टन उत्पादनाची हमी मिळाली.

गुंठ्याला ३ टन उत्पादन 

यामुळे शेतात तब्बल ५० ते ५५ पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला. पाटील यांना गुंठ्याला ३ टन उत्पादन घेण्यात यश आले आहे. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस ३ ते ४ ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागत आहे. एकसारखा तीन एकरातील हा ऊस तब्बल ३६० टन उत्पादन देणारा ठरणार आहे. यासाठी त्यांना ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेय.

शंकर पाटील यांच्या तीन एकर शेतात हा ५० ते ५५ पेरांचा लांबलचक ऊस वाढला आहे. उसाची शेती परवडत नाही; अशी तक्रार त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन फोल ठरविली. शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT