Karjat APMC News ,ram shinde, rohit pawar,  Saam Tv
ऍग्रो वन

Karjat Krushi Utpanna Bazar Samiti News : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; कर्जत बाजार समितीसाठी फेर मतमोजणी सुरू

आजचा निकाल काय लागताे याकडे सर्वांचे लागले लक्ष.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Karjat Bajar Samiti News : नगर जिल्ह्यात पाथर्डी आणि नगर तालुक्यांत एक हाती सत्ता मिळवली असून कर्जत आणि श्रीगोंदा येथे बहुमत मिळाले नसले तरी काहीसे यश आम्ही मिळवले आहे. त्या ठिकाणी सभापती आमचाच होईल असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe-patil) यांनी केले हाेते. दरम्यान राम शिंदे गटाने कर्जत बाजार समितीच्या निवडणूकीच्या निकालावर आक्षेप घेतला हाेता. त्यामुळे आज (साेमवार) पुन्हा फेर मतमाेजणी (Karjat Krushi Utpanna Bazar Samiti voting re-counting begins) घेण्यात येत आहे. (Maharashtra News)

नगर (nagar) जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीची (apmc) निवडणूकीत पाथर्डी आणि नगर तालुका या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलची एक हाती सत्ता आली. नगर तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले तर पाथर्डी मध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. तर जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पुरस्कृत केलेल्या पॅनलला समसमान म्हणजेच नऊ नऊ जागा मिळाल्या आहेत.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या पॅनलने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक हाती सत्ता मिळवली. श्रीगोंदा बाजार समितीमध्ये बदल घडला असून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाकडे ही समिती आली. या ठिकाणी भाजपचे बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.

कर्जत बाजार समिती निवडणुकीत दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला. या ठिकाणी भाजप आमदार राम शिंदे (mla ram shinde) गटाला 9 तर राष्ट्रवादीच्या रोहित पवारांच्या (mla rohit pawar) गटाला 9 जागा मिळाल्या. कर्जत आणि श्रीगोंदा येथे बहुमत मिळाले नसले तरी काहीसे यश आम्ही मिळवले आहे आणि त्या ठिकाणी सभापती आमचाच होईल असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले हाेते. त्यामुळे बहुमत नसले तरी सभापती आमचा होईल या वक्तव्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत सुद्धा काही जादू होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते. त्यातच राम शिंदे यांच्या गटाने निवडणुक निकालावर आक्षेप घेतला हाेता.

आज (साेमवार) कर्जत बाजार समितीच्या निकालाची फेर मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. सोसायटी सर्वसाधारण आणि महिला मतदारसंघासाठी फेर मतमोजणी हाेत आहे. दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने झाला मोठा पेच निर्माण झाला हाेता. मात्र आता यावर दोन जागांसाठी राम शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने पुन्हा मतमोजणी हाेत असल्याने निकालावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT