Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price : टोमँटोची लाली पडली फिकी; केवळ मिळतोय अडीच रुपयांचा भाव, शेतकरी अडचणीत

Junnar Pune News : जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात टोमॅटोला प्रतवारीनुसार प्रति वीस किलोच्या क्रेटला ५० ते १४० रुपये भाव मिळत आहे. अर्थात प्रतिकिलो अडीच रुपये ते सात रुपये बाजारभाव

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : एकवेळ टोमॅटोचे दर खूप वाढले होते. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले होते. मात्र मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. टोमॅटोला प्रति किलोला अडीच रुपये इतकाच बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्च सोडाच मजुरी वाहतुक खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मागील तीन महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात सध्या टोमॅटोला प्रतवारीनुसार प्रति वीस किलोच्या क्रेटला फक्त ५० रुपये ते १४० रुपये भाव मिळत आहे. अर्थात प्रतिकिलो अडीच रुपये ते सात रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

मजुरी, वाहतुकीचा खर्चही निघेना 

टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्याना तोडणीसाठी लागणार मजुरी आणि वाहतुक खर्च देखील मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमँटोची डोळ्यासमोर मातीमोल किंमत मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

लिंबूचे दर १६० रुपये किलोवर

उन्हाचे चटके जाणवू लागल्याने सरबतसाठी लागणाऱ्या लिंबूची मागणी वाढली आहे. मात्र, आवक निम्म्यावर असल्याने किरकोळ बाजारात महिनाभरापूर्वी ५० रुपये किलो दराने मिळणारे लिंबू आता १६० रुपये किलोने मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने घरगुती ग्राहकांसह रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, हॉटेल व खानावळी चालकांकडून लिंबांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत लिंबाची आवक मात्र घटत चालली आहे. यामुळे बाजारात लिंबाचे दर वाढले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

SCROLL FOR NEXT