Jalna News Rain Saam tv
ऍग्रो वन

Jalna News: अवकाळी पावसाचा फटका; हरभरा, कांदा, गव्हाचे नुकसान

अवकाळी पावसाचा फटका; हरभरा, कांदा, गव्हाचे नुकसान

लक्ष्मण सोळुंके

जालना : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मध्‍यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचे (Rain) आगमन झाले. या पावसामुळे हातातोंडाशी (Jalna News) आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रामुख्‍याने गहू, हरभरा व कांद्याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. (Letest Marathi News)

जालना जिल्‍ह्यातील भोकरदन, बदनापूर, अंबड तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसाला सुरवात झाली. या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी आलेल्या गव्हाच्या पिकांसह हरभरा, कांदा, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात सुरू असलेल्या या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उभं गव्हाचे पीक अक्षरशः आडवे पडायला सुरुवात झाली.

शेतकरी अडकचणीत

खरीप हंगामात चांगले उत्‍पन्‍न मिळाले नाही. जे मिळाले त्‍याला देखील चांगला भाव मिळालेला नाही. यात आता रब्‍बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते वजीरखेडा शिवारात नुकसान अधिक झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

SCROLL FOR NEXT