अक्षय शिंदे
जालना : यंदा पावसाळ्यात राज्यभरात जोरदार पाऊस झाला. यातच सप्टेंबर पाहिल्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यात जालना जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने झोडपले होते. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने मदत जाहीर केली होती. मात्र हि मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे.
जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात जालना जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी पोटी मदत मिळावी यासाठी पंचनामे करून शासनाने प्रस्ताव मागविले होते. यासंदर्भात जालना जिल्हा प्रशासनाने ४१२ कोटी ३० लाख ९३ हजार ६६० रुपयांचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वीच सरकारला पाठवला आहे. मात्र चार महिने उलटूनही अद्यापही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने शेतकरी आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. यात्तच सध्याच्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना आणखी नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील त्यांना मदत निधी मिळत नसल्याचे जालना जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. दरम्यान नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात आक्रमक आंदोलन करू; असा इशारा आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.