Jalgaon Parola News Saam tv
ऍग्रो वन

Parola News: सततच्या नापिकीतून कर्जबाजारी; शेतकऱ्याने संपविले जीवन 

Jalgaon News : सततच्या नापिकीतून कर्जबाजारी: शेतकऱ्याने संपविले जीवन 

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : पावसाचा लहरीपणातून पिकांचे झालेले नुकसान यामुळे सततची नापिकीला तोंड द्यावे लागत होते. यात यंदा (Parola) पडलेल्या दुष्काळामुळे कर्जाचा बोजा वाढला. यातून ५४ वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Maharashtra News)

चहुत्रे (ता. पारोळा) येथील अमरसिंग मंगो वंजारी (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा त्यांच्या वडगाव शिवारात असलेल्या शेतात कापूस व इतर पिकांची लागवड केली होती. परंतु सुरवातीला पावसाने दडी मारल्याने व शेवटी जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन नापिकीची अवस्था झाली. शेतातून उत्पन्नाची हमी नव्हती. 

आत्महत्येचे सांगितले पुतण्याला 

अमरशिंग वंजारी यांनी पीककर्ज व इतर हात उसनवार कर्ज घेतले होते. यंदा कर्ज फिटणार नाही, या निराशेतून त्यांनी आपल्या शेतातून पुतण्यास सांगितले, की मी शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करत आहे. यावेळी लगेच नातेवाईकांनी शेतात घटनास्थळी धाव घेतली असता अमरसिंग यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना सोमवारी (ता. २) त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात रमेश बंजारा यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT