Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : ज्ञानेश्वर वाणी हे आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास होते. तीन विवाहित बहिणीच्या विवाहानंतर एकुलता ज्ञानेश्वर शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेतातून अपेक्षित उत्पन्न आले नाही. यात शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोक्यावर बोजा असल्याने तणावातून (Farmer) शेतकऱ्याने रेल्वेसमोर उडी मारत जीवन संपविल्याची घटना (Jalgaon) दापोरा (ता.जळगाव) येथे घडली आहे. (Breaking Marathi News)

दापोरा (ता, जळगाव) येथील ज्ञानेश्वर त्र्यंबक वाणी (वय ३५,) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर वाणी हे आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास होते. तीन विवाहित बहिणीच्या विवाहानंतर एकुलता ज्ञानेश्वर शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र पावसाच्या लहरीपणातून नापिकी यात डोक्यावर असलेले कर्ज व कौटुंबिक अडचणीमुळे १५ मार्चला रात्री आठच्या सुमारास दापोरा ते शिरसोली दरम्यान (Railway) रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामस्थांची धाव 
ग्रामस्थांना घटना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिस पाटील जितेश गवांदे यांनी पोलीसांना महिती देत, मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT