Water Shortage : बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट?; मांजरा धरणातील पाणीसाठा होतोय कमी

Beed News : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणात असलेला पाणीसाठा देखील खालावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
Manjra Dam
Manjra Dam Saam tv
Published On

बीड : यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी संकट निर्माण झाले आहे. धरणात असलेल्या पाणीसाठ्याची देखील पातळी खालावत आहे. अशाच प्रकारे मांजर धरणातील (Manjra Dam) पाणी पातळी देखील कमी होत असल्याने (Beed) बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

Manjra Dam
Nandurbar Accident : सायकलवरून जात असलेल्या विद्यार्थिनीला ट्रकची धडक; विद्यार्थिनी गंभीर जखमी

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई (Water Crisis) जाणवू लागली आहे. धरणात असलेला पाणीसाठा देखील खालावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शहरांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात होत असल्याचे चित्र देखील आतापासून पाहण्यास मिळत आहे. हीच परिस्थिती बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मांजर धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Manjra Dam
Parali News : नगरपालिकेकडून कर भरण्यासाठी लावले बॅनर; परळीकरांचेही सार्वजनिक नोटीस लावून उत्तर

बीडसह (Latur) लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी १० टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला ९.५१ टक्क्यांवर आला असून अवघ्या ४ दिवसात तब्बल ०.४९ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळ उन्हाळा आता कुठं सुरू झाला असून एप्रिल आणि मे महिन्यात बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com