Parali News : नगरपालिकेकडून कर भरण्यासाठी लावले बॅनर; परळीकरांचेही सार्वजनिक नोटीस लावून उत्तर

Beed Parali News : बीड जिल्ह्यातील परळी शहरात पायाभूत सुविधासाठी कोट्यावधीचा खर्च केला जातोय. कागदोपत्री आकडे मोठमोठे पाहायला मिळतात.
Parali News
Parali NewsSaam tv
Published On

बीड : परळी नगरपालिकेने शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी, घरपट्टी टॅक्स भरावा. असा मजकूर टाकून शहरात (Beed) ठीकठिकाणी बॅनर लावले आहेत. तर नगरपालिकेच्या या बॅनरबाजी विरोधात आणि नोटीस विरोधात परळीकर (Parali) मात्र आक्रमक झाले आहेत. नगरपालिकेला जशास तसे उत्तर देत परळीकरांनी देखील नगरपालिकेच्या बॅनरखाली पोस्टर लावत, अगोदर पाणी द्या, नाल्या काढा, काढलेल्या नाल्या उचला, पायाभूत सुविधा द्या आणि नंतरच टॅक्स मागायला या.. अशा आशयाचे पोस्टर परळीकरांनी शहरात लावले आहेत. (Tajya Batmya)

Parali News
Shahada Accident : बिथरलेला बैल कारची काच फोडून घुसला आत; दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण बचावले

बीड जिल्ह्यातील परळी शहरात पायाभूत सुविधासाठी कोट्यावधीचा खर्च केला जातोय. कागदोपत्री आकडे मोठमोठे पाहायला मिळतात. मात्र परळीकरांना खरचं सुविधा मिळतात का ? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आर्थिक वर्ष समाप्तीवर अर्थात मार्च एन्डींग असल्याने कर (Tax) वसुली केली जात आहे. यासाठी नगरपालिकेने देखील वसुली जोरात केली असून थकबाकीदार असलेल्याना कर भरण्याचे आवाहन करणारे बॅनर शहरात लावले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parali News
Nandurbar Accident : सायकलवरून जात असलेल्या विद्यार्थिनीला ट्रकची धडक; विद्यार्थिनी गंभीर जखमी

परळीच्या नागापूर वान धरणामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील नगरपालिका वेळेवर पाणी सोडत नाही. यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकंती करावी लागते आहे. नाल्या काढल्या जात नाही, काढलेल्या नाल्या वेळेवर उचलल्या जात नाहीत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अगोदर नगरपालिकेने आम्हाला पायाभूत सुविधा द्याव्यात आणि नंतरच टॅक्स मागायला यावे; असं आव्हान परळीकरांनी नगरपालिकेला दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com