Jalgaon Rain Saam tv
ऍग्रो वन

Heavy Rain: परतीच्या पावसाने झोडपले; कापूस, मक्‍याचे नुकसान

परतीच्या पावसाने झोडपले; कापूस, मक्‍याचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

कजगाव (जळगाव) : परिसरात परतीच्या पावसाने सोमवारी (ता. १७) जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दुपारी एकला सुरू झालेला धुव्वाधार पाऊस (Heavy Rain) तब्बल दीड तास सुरू होता. या परतीच्या पावसाने (Cotton) कापूस, मका, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कापसाची बोंडे काळी पडत आहेत. उत्पन्नात देखील घट येण्याची चिन्हे आहेत. (Live Marathi News)

सध्या कापूस वेचणी व मका काढणीचा (Jalgaon) हंगाम सुरू असताना सोमवारी (ता. १७) झालेल्या मुसळधार पावसाने कापसाची बोंड निपसून पडली तर अगोदरचा भिजलेला कापूस सुकविण्यासाठी टाकलेला होता, तो देखील पुन्हा पावसाच्या तडाख्यात सापडला. जेमतेम सुकवून काढणीसाठी तयार केलेला मका, ज्वारी हे पुन्हा पावसात भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यापुर्वीही ढगफुटीसदृश पाऊस

गेल्या महिन्यात १९ ऑगस्टला, नंतर ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे कजगाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पुन्हा आज पहाटे व दुपारी झालेल्या धुव्वाधार पावसाने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. दरम्यान, कजगावात मुसळधार पाऊस झाल्यानंतर बसस्थानक आवारात तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

एकिकडे हसू आणि दुसरीकडे अश्रू

सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे विहिरींची पातळी देखील वाढली, तसेच भविष्यात पाणी उपलब्धता दीर्घ काळ असू शकते, असे शेतकरी जाणकार सांगतात. या पावसामुळे एकिकडे हसू आणि दुसरीकडे अश्रू अशी अवस्था झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राड

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT