Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: गोड्या पाण्यातील मत्स्य सूचित ‘स्पॉटेडसेल बार्ब’चे नाव; महाराष्ट्रात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यातून नोंद

गोड्या पाण्यातील मत्स्य सूचित ‘स्पॉटेडसेल बार्ब’चे नाव; महाराष्ट्रात पहिल्यांदा घेतली जळगाव जिल्ह्यातून नोंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ‘शोध गोड्या पाण्यातील माशांचा’ या मोहिमेद्वारे 34 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद घेतली. यावर्षी महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या ‘स्पॉटेडसेल बार्ब’ या माशाचा (Fish) शोध लावण्यात यश आले आहे. (Breaking Marathi News)

वन्यजीव संरक्षण संस्था अर्थात व्‍हीजेएसएस ही (Jalgaon) संस्था राज्यातील जैविक विविधतेच्या संशोधन, संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या अभ्यासकांचे पक्षी, वनस्पती, कीटक, सरीसृप, उभयचर, फुलपाखरू, पतंग, अश्या अनेक प्रजातींवर शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळकृष्ण देवरे आणि कल्पेश तायडे यांच्यासोबत मोहिम राबविली. यात शोध लागलेल्‍या स्‍पॉटेडसेल बार्ब हा महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मत्स्य सूचित अजून एक माशाची भर पडली असल्‍याचे मस्त्य अभ्यासक गौरव शिंदे यांनी सांगितले.

‘स्पॉटेडसेल बार्ब’चा शोध बंगालच्या ईशान्य भागातून हॅमिल्टनने 1822 मध्ये लावला. अगोदर हा मासा फक्त गंगा आणि ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उप नदीमध्‍येच मिळायचा. 2015 मध्‍ये हा मासा तामिडनाडूमध्ये मिळाल्याची नोंद आहे. आम्ही फेब्रुवारी 2021 मध्ये जळगांव जिल्ह्यातील वाघूर धरण बॅक वॉटरमध्ये या माशाला शोधून काढले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशियाच्या टॅप्रोबॅनिका या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत याचा शोध निबंध शॉर्ट नोट प्रसिद्ध झाला. हे आमचे यश आहे असे गौरव शिंदे आणि बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.

असा दिसतो स्पॉटेडसेल बार्ब

खोल शरीर, शंकूच्या आकाराचे डोके, पंख फिकट नारिंगी असतात. नरांमधे हा रंग थोडा गडद असतो. लांबी साधारण 3.5 सेंटीमीटर असते. शरीर चंदेरी रंगाचे असून कल्या शेजारी काळा पट्टा शेपटीकडे 2 काळे ठिपके असतात. गोड्या पाण्यातील जलीय वनस्पतीं मध्ये गुरामी मासे आणि इतर बार्ब प्रजातीसोबत विचरण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT