Farmer saam tv
ऍग्रो वन

खानदेशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

खानदेशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

Rajesh Sonwane

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषिपंप वीज जोडणी धोरणातंर्गत खानदेशातील १ लाख ६१ हजार ७०० शेतकऱ्यांनी १६२ कोटी ५० लाख रुपये वीजबिल भरून योजनेचा लाभ घेतला. शिवाय सुधारित थकबाकीत ५० टक्के सवलत मिळवण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी (Farmer) वीजबिल भरणे आवश्यक आहे. (jalgaon news one lakh 61 thousand farmers in Khandesh paid their electricity bills)

कृषिपंप वीज जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी जळगाव (Jalgaon), धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कृषी वीज धोरणाबाबत ठिकठिकाणी महावितरणच्या (MSEDCL) अधिकारी -कर्मचाऱ्यांनी वीजबिलात मिळणारी सवलत व त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून स्थानिक विद्युत विकास याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच महावितरणच्या विविध कार्यालयांत कृषी वीज धोरणाचे वाचन करण्यात आले. तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जागेवरच वीजबिल भरले, त्यांचा महावितरणतर्फे सत्कार करण्यात आला.

असा झाला भरणा

जळगाव जिल्ह्यातील ९३ हजार २८८ शेतकऱ्यांनी ९७ कोटी ६१ लाख, धुळे (Dhule) जिल्ह्यातील ४४ हजार ५५५ शेतकऱ्यांनी ३० कोटी ३७ लाख तर नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील २३ हजार ८५७ ग्राहकांनी ३४ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

३१ मार्चपर्यंत वाढली मुदत

कृषिपंपांच्या वसुलीतील ३३ टक्के निधी हा त्याच ग्रामपंचायती क्षेत्रात वापरण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने ग्राहकांचा पैसा त्यांच्या सुविधेसाठी तात्काळ वापरता येईल. ग्रामपंचायत स्तरावर सुविधा निर्माण करता येतील अशी तरतूद या योजनेत केलेली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT