Mahavitaran Saam tv
ऍग्रो वन

खानदेशातील शेतकऱ्यांच्‍या ५६५ तक्रारी निकाली; महावितरणचे कृषी वीज ग्राहक मेळावा

खानदेशातील शेतकऱ्यांच्‍या ५६५ तक्रारी निकाली; महावितरणचे कृषी वीज ग्राहक मेळावा

Rajesh Sonwane

जळगाव : कृषी वीजबिल तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी खानदेशात ठिकठिकाणी आयोजित कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत महावितरणतर्फे शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीची साद घातली जात आहे. आतापर्यंत झालेल्या १८७ मेळाव्यात प्राप्त तक्रारी निकाली काढल्याने शेतकऱ्यांनीही (Farmer) वीजबिल भरण्यास दिलेला प्रतिसाद कायम आहे. (jalgaon MSEDCL Agricultural Electricity Consumer Meet Resolved 565 complaints of farmers)

वीजबिलासह शेतकऱ्यांच्या सर्व वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी 10 ते 31 मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तात्काळ कळविण्यात येत आहे.

५६५ तक्रारी निकाली

महावितरणतर्फे (MSEDCL) खानदेशात आतापर्यंत 187 कृषी वीज ग्राहक मेळावे झाले. त्यात वीजबिलांच्या 559 व इतर 6 अशा 565 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. (Jalgoan) जळगाव जिल्ह्यात 129 मेळाव्यांत 311, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात 30 मेळाव्यांत 155 तर धुळे (Dhule) जिल्ह्यात 28 मेळाव्यांत 99 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. जागेवरच तातडीने तक्रार निवारण झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, वीजबिल भरण्याकडे त्यांचा ओढा कायम आहे. मेळाव्यांत उत्स्फूर्तपणे शेतकरी बिल भरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT