Banana Transport 
ऍग्रो वन

पाकमधील केळी निर्यातबंदी उठवा; शेतकरीची मागणी, निर्यातीमुळे यापूर्वी जास्तीचा भाव..

पूर्वीप्रमाणे पुंछ व ऊरी रस्ते वाहतूक मार्गे शेतमालाची आयात-निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सावदा परिसरातील केळी उत्पादक शेतकरी करू लागले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सावदा (जळगाव) : पुलवामा घटनेपासून पाकिस्तानसोबत देशाने व्यापार बंद केला आहे. हा एक योग्य निर्णय व आंतरराष्ट्रीय नीतीचा एक भाग असला तरी काही अटी घालून पाकिस्तानशी बंद केलेला व्यापार पुन्हा सुरू करण्यास हरकत नसावी. जर असे होऊन केळी व अन्य शेतमाल निर्यात- आयातसाठी सरकारने पुढाकार घेऊन परवानगी दिली; तर केळीला भाव मिळू शकेल, अशी काही शेतकरी मागणी करीत आहे. (jalgaon-news-Lift-ban-on-banana-exports-in-Pakistan-Demand-from-farmers)

जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जाते. देशात व परदेशात केळी निर्यातदार म्हणून जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. काही शेतकऱ्यांनी एकत्र येत अपेडाच्या माध्यमातून केळी परदेशात निर्यातीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याची केळीची मुख्य बाजारपेठ अजूनही देशाच्या उत्तर भारतात आहे. शेतकऱ्यांना या बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. देशाच्या उत्तर भागातील व्यापारी यांच्या मनलहरी पणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. परिणामी केळीचे बाजारभाव स्थिर न राहता कमी अधिक प्रमाणात होत असतात. केळी जर पाकिस्तान मार्गे अन्य आखाती देशात केळी निर्यात सुरू झाल्यास केळी बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल, असे काही जाणकारांचे मत आहे.

पाकमध्ये ४० ट्रक केळीची गरज

जम्मू कश्मीर येथील एका व्यापाऱ्याच्या माहितीनुसार पाकिस्तानला दररोज सुमारे ४० ट्रक, पाच ते सात हजार क्विंटल प्रति रोज केळीची गरज असते. ही गरज आपला देश पूर्ण करू शकतो.

‘माल के बदले माल’

पाकिस्तानात केळी निर्यात केल्याच्या बदल्यात पाकिस्तानातील व्यापारी आपल्या देशातील व्यापाऱ्यांशी आर्थिक व्यवहार न करता ‘माल के बदले माल’ असा व्यवहार करून केळीच्या बदल्यात ड्रायफ्रूट बदाम, अक्रोड, काजू हे पाठवित असतात. त्यामुळे, देशांतर्गत या ड्रायफ्रूटच्या किंमतीत देखील घसरण होईल.

भाव स्थिर राहणार

केळी बाजारभाव सद्यस्थितीत बाराशे ते चौदाशे प्रतिक्विंटल जवळपास आहे. कापणी मात्र सातशे ते आठशे रुपयांत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाकिस्तानातील केळी निर्यातबंदी उठवल्यास केळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, मागणी वाढल्यास किंमत वाढेल व बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल.

निर्यातीमुळे यापूर्वी जास्तीचा भाव

पाकिस्तानमध्ये २०१७ - २०१८ ला केळी निर्यात केली जात होती. तेव्हा केळीचे बाजारभाव हे गगनाला भिडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केळी कामगार व मजूर यांच्या हाताला देखील मोठे काम लाभले असल्याने केळी पट्ट्यात आबादानी होती. परंतु पाकिस्तानात केळी निर्यात बंद झाल्याने २०१७-१८ पासून केळी बाजारभाव कधीच पंधराशे रुपये प्रतिक्विंटलच्या वर गेलेले नाहीत.

पाकिस्तानात केळीची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकरी हितासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- कमलाकर पाटील, केळी उत्पादक शेतकरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT