Vegetable 
ऍग्रो वन

पावसामुळे पालेभाज्या जमिनीतच; भाजीपाला विकला जातोय वाट्यावर

पावसामुळे पालेभाज्या जमिनीतच; भाजीपाला विकला जातोय वाट्यावर

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेला पाऊसाने जोरदार आगमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र जोरदार पावसामुळे मेथी, पोकळा, गिलके व पालक हे पाण्याखाली आल्याने त्याची आवक कमी झाली. सुमारे ५० ते ६० रुपये किलोने विकला जाणारा टमाटा आता १५ रुपये किलो दराने विकला जात असल्याने टमाट्याची लाली यामुळे उतरली असून विक्रेत्‍यांना भाजीपाला वाट्यावर विकावा लागत आहे.

गृहिनाणींना रोजच स्वयंपाक करणेसाठी भाजीपाल्‍याची गरज असते. प्रामुख्खाने दैनंदिन लागणारी हिरवी मिरची, टमाटा, कांदे यांचे भाव कमी झाल्याने गृहीणीत आनंद आहे. तर एकीकडे लिलावातून विकत घेवुन किरकोळ विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे गणित कोलडमळले असुन ग्राहकांनी तात्काळ आपला भाजीपाला विकत घ्यावा; यासाठी १० रुपये वाटा अशी विक्री सकाळपासुनच बाजारात दिसुन येत आहे. ऐरवी सकाळी भाजीपाल्‍याचा दर जास्त असतो. सायंकाळी माल शिल्लक राहु नये. यासाठी विक्रेते कमी जास्त किंमतीत विकण्याचा प्रयत्न करतो.

हिरवी मिरची २० तर वटाणा ८० रुपये किलो

यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यामुळे भाजीपाला लिलावात हिरवी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होतांना दिसुन येत आहे. यामुळे बाजारात हिरवी मिरची प्रति किलो १५ ते २० प्रतिकिलो तर वटाणा ८० रुपये प्रतिकिलो आहे. अतीपावसामुळे मेथी, गिलके, पोकळा व पालक यांचे उत्पन्न कमी झाल्याने बाजारात पालेभाज्या ६० रुपये दराने विक्री केल्या जात आहे.

भाजीपाल्‍याचे दर (प्रतिकिलो)

फुल कोबी- ४० रुपये

मिरची - २० रुपये

वांगे -३० रुपये

कांदा -२० रुपये

गिलके- ६० रुपये

वटाणा -८० रुपये

टमाटा -१५ रुपये

शेवगा - ६० रुपये

पोकळा -६० रुपये

वाल - २० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Waterfall : पावसाळ्यातील स्वर्ग! साताऱ्यातील 'हे' धबधबे पर्यटकांना घालतात भुरळ

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

Tharala Tar Mag! : सायलीला लागले डोहाळे, अर्जुन लाडक्या बायकोसाठी बनवतो लाडू; प्रियामुळे दोघांच्या आनंदाला लागणार ग्रहण | VIDEO

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Nashik : नाशिकातील पर्यटनस्थळ बनतायत गुन्हेगारीचा अड्डा, भावलीत पर्यटकांवर हल्ला; ९ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT