तोंडापूर (जळगाव) : कुंभारी बु. (ता.जामनेर) येथील पाझर तलावात तरुण शेतकरी शालिक नामदेव जोशी (वय ३५) यांनी आत्महत्या (Suicide) केली असल्याची घटना उघडकीस आली. यामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (jalgaon news Kumbhari Suicide of a young farmer)
कुंभारी बु. येथील येथील शेतकरी (Farmer) शालिक नामदेव जोशी (वय ३५) हा तरुण शेतकरी यांनी २९ जूनला स्वतःच्या शेतात दुपारी काम केले. यानंतर रात्रीच्या वेळी त्याने पाझर तलावात आत्महत्या (Farmer Suicide) केली असल्याची घटना सकाळी उघडकीस आली. शालिक जोशी याच्या वडिलांच्या नावे कुंभारी बु. शिवारात पाझर तलावाच्या शेजारी शेती आहे. शेताची मशागत करून महागाचे बि बियाणे पेरणी करण्यात आली. पावसाचा अनियमितपना वेळेवर पाऊस पडत नसल्याने व आयडीबीआय बँकेचे (Bank) एक लाख रुपये बोजा असल्यामुळे नैराश्य येवून व शेतातील कामे आटोपल्यानंतर शेजारी असल्यालेल्या पाझर तलावात आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
रात्री घरी न आल्याने शोधाशोध
रात्री घरी न आल्याने रात्रभर घरच्यांनी शोधाशोध केली. परंतु आढळून न आल्याने पुन्हा सकाळी शोधा शोध केली. मात्र सकाळी सरपंच पती हिरामण जोशी हे शेताच्या कामासाठी गेले असता पाझर तलावात शालिक जोशी याचे शव पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. गावकऱ्यांच्या व पोलीस पाटील विजय जोशी, माजी सरपंच सुरतसिंग जोशी, लक्ष्मण जोशी आदींनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या आदेशानुसार हवालदार अनिल सुरवाडे याच्या मदतीने पाण्याच्या बाहेर काढुन शवविछेदनसाठी पहुर येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. शालिक जोशी यांना चार मुले, पत्नी असा परिवार असून तरुण शेतकरी यांनी आत्महत्या केल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.