Kisan credit cards Saam tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड; १ मेपर्यंत मोहिम

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड; १ मेपर्यंत मोहिम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अशी मोहीम राबविली जात आहे. त्यात प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना (Farmer) किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. (jalgaon news Kisan credit cards to farmers Campaign till May 1st)

राज्यात पीएम किसान नोंदणीकृत एकूण १ कोटी १४ लाख ९३ लाख लाभार्थ्यांपैकी ८१ लाख ३६ हजार लाभार्थी किसान क्रेडिट कार्डधारक आहेत. राज्यात (Jalgaon News) जवळपास ३३ लाख ५७ हजार पीएम किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्डधारक नाहीत. यासाठी रविवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Credit Card) देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणा सहकार्य करीत आहे.

गावनिहाय पीक विमा पाठशाळा

सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांची अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन १ मेपर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किंसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची, त्यांचे पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे. २६ एप्रिल रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाळा घेण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp आणि Instagram वरील चॅटिग होईल सुरक्षित; स्कॅम कॉल्सचा येणार अलर्ट

Bhaubeej 2025 : या वेळेत भाऊबीज करणं टाळा, वाचा राहुकाळा मुहूर्त आणि ओवाळणीच्या टिप्स

Nightmares Research: दररोज पडणारे भयानक स्वप्न असू शकतं जीवघेणं? संशोधनात उघड झाला धक्कादायक निष्कर्ष

Leopard Attack : आई जिंकली, बिबट्या हरला...! बिबट्याची शेपूट ओढत आईने केली लेकराची सुटका

Maharashtra Live News Update: भायखळ्यात घर कोसळलं; सात जण जखमी, बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT