क्रेडीट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या नावाने फसवणूक

क्रेडीट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या नावाने फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : खासगी व्यवसाय करणाऱ्या तरूणाला क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या नावाखाली ओटीपी विचारून १५ हजाराची ऑनलाईन फसवणूक (Cyber Crime) झाल्याची घटना अमळनेर येथे उघडकीस आली आहे. (jalgaon news Fraud in the name of raising credit card limits)

Cyber Crime
लग्नघरावर दुःखाचा डोंगर..विजेचा धक्‍का लागून चुलत भावाचा मृत्यू

अमळनेर (Amalner) शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा शेख मोहम्मंद जुनेद (वय २९) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. खासगी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. दरम्‍यान १९ एप्रिलला सायंकाळी त्याला ०८८८१०२९१९२ या अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्ती रोहित सिंग बोलत असल्याचे सांगत आयसीआयसीआय बँकेतील कर्मचारी असल्याचे त्‍याने सांगितले.

पाच हजाराचे तीन व्‍यवहार

तुमचे (Credit Card) क्रेडीट कार्डचे ९० हजाराहून १ लाख ६५ हजार रूपयांचे लिमीट वाढविण्याचे असल्याचे कंपनीने ठरविले आहे. असे सांगून तुम्हाला आलेला ओटीपी गोड बोलून विचारून घेतला. दरम्यान, काही कळण्याच्या आत त्यांच्या क्रेडीट कार्डच्या माधमातून ५ हजाराचे तिन व्यवहार करण्यात येवून १५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर शेख मोहमंद यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली. तक्रारीवरून २३ एप्रिलला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com