Yawal News Saam tv
ऍग्रो वन

Yawal News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन; यावल तालुक्यातील घटना

Jalgaon News : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हिरालाल सोनवणे यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच गावात देखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतले. पैशांसाठी तगादा सुरु झाला होता

Rajesh Sonwane

जळगाव : शेतीसाठी कर्ज घेतले असताना शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे बँकेचं कर्ज व हातउसनवारीचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. 

यावल तालुक्यातील पिळोदा येथील हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिळोदा येथे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हिरालाल सोनवणे यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच गावात देखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतली होती. या पैशांसाठी हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता. 

पैसे फेडण्याची होती विवंचना 

डोक्यावर कर्जाचा बोजा असताना शेतात टाकलेल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्न फारसे चांगले आले नाही. याशिवाय शेतमालाला देखील भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत हिरालाल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याच विवंचनेत हिरालाल सोनवणे यांनी २६ जानेवारीच्या दिवशी घरात कोणी नसताना कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उपचारादरम्यान मृत्यू 
दरम्यान सदर प्रकार कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर हिरालाल यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. दोन दिवसांपासून उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT