Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने संपविले जीवन; जळगाव जिल्ह्यातील घटना

Jalgaon News : कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव तालुक्यातील धानवड येथील ५५ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने घरात गळफास घेत (Jalgaon) आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Live Marathi News)

जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील हे पत्नी, दोन मुलं आणि नातू यांच्यासह वास्तव्याला होते. दरम्यान त्यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) पहाटे राहत्या घराच्या मागच्या खोलीत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. यानंतर आवाजाने शेजारी मदतीला आले. त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्‍हा रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुसाईड नोट लिहून घेतला गळफास 
आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात ‘कर्जबाजारीपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे; असे त्यात नमूद केले होते. याच शेत कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.  एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

SCROLL FOR NEXT