Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत टोकाचे पाऊल; तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील वाकडी येथील सुनील वामन पाटील (वय ४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

Rajesh Sonwane

जळगाव : शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण शेतकऱ्याने जोड व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडू शकत नसल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत वाकडी येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

जळगाव (Jalgaon News) तालुक्यातील वाकडी येथील सुनील वामन पाटील (वय ४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्याने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेत तो होता. याच विवंचनेतूनच त्याने २३ ऑक्टोबरला शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. 

दरम्यान कुटुंबीयांनी सुनील यास तात्काळ (Jalgaon Medical collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आला आहे. सुनील पाटील यांचा यांच्या मृत्यूने वाकडी गावामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT