Tur Price Saam tv
ऍग्रो वन

Tur Price : तुरीच्या दरात एक हजारांची घसरण; विकायची की ठेवायची शेतकरी विवंचनेत

Jalgaon News : ऐन बहरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले तर तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना रावेर व अन्य भागात गारपिटीचा फटका बसला

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव बाजारात सध्या नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. क्विंटलमागे एक ते दीड हजारांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. त्यामुळे तूर घरात ठेवायची की विकायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

यंदा पावसाच्या लहरी पणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकांना बसला आहे. यात आता काढणीला आलेल्या तुरीला देखील याचा फटका बसला आहे. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन बहरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले. तर तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना रावेर व अन्य भागात गारपिटीचा फटका बसला त्यामुळे तुरीचे नुकसान झाले.

दरात घसरणीने चिंता वाढली 

अगोदरच निसर्गाच्या लागरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला असताना आता तूर काढणी करत विक्रीसाठी नेत आहे. मात्र बाजार समितीत क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर घसरल्याने तूर विक्री करायची कि विकायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.  

रिसोड बाजार समितीत चिया खरेदी सुरू
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात चिया पिकाचा वाढलेला पेरा लक्षात घेता रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता या पिकाची खरेदी सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चिया विक्रीसाठी होणारी गैरसोय टळणार आहे. याआधी मध्य प्रदेशातील नीमच या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना चियाची विक्री करावी लागत होती. कमी खर्चात चांगलं उत्पादन देणार पीक म्हणूनची याची ओळख आहे. सोयाबीन, कापूस यासारख्या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा चिया पिकाकडे कल वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा चांगल्या पर्याय होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आता चीया पिकाकडे वळू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : प्रवीण गायकवाड यांचा पोलिस संरक्षण घेण्यास नकार

Model Passed Away: प्रसिद्ध भारतीय मॉडलने केली आत्महत्या; अवघ्या २५ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

Who is Deepak Kate: प्रविण गायकवाडांवर शाईफेक करणारा व्यक्ती कोण?

Pune News: घरी जाताना भयंकर घडलं, इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून २ तरुणांचा जागीच मृत्यू; पुण्यात खळबळ

Ukadiche Modak Recipe: संकष्टी निमित्त घरीच बनवा पारंपरिक उकडीचे मोदक, अगदी सोप्या पद्धतीने

SCROLL FOR NEXT