Chalisgaon News
Chalisgaon News Saam tv
ऍग्रो वन

Chalisgaon News: बँक, सावकाराकडील कर्जाचा बोजा; विवंचनेतून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : देवळी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी ७२ वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) शेतात विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. विक्रम शिवराम पाटील यांना दोन मुले असून ती मुकबधीर आहेत. (Breaking Marathi News)

देवळी -डोण रस्त्यावर विक्रम पाटील यांची (Chalisgaon) अवघी दोन एकर कोरडवाहू शेती असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी खासगी सावकारांसह (Bank) बॅंकेकडूनही कर्ज घेतले होते. कर्जाची परतपेढ केली जात नसल्याने विक्रम पाटील हे गेल्या काही दिवसांपासून व्यथित होते. आज पहाटे सहाच्या सुमारास ते शेतात गेले.

गळफास नंतर घेतले विषारी द्रव्‍य

सुरवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. बराच वेळ होऊनही विक्रम पाटील घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने आपल्या पुतण्याला त्यांना पाहण्यासाठी शेतात पाठवले. यावेळी विक्रम पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे उघडकीस आले. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सुनील व शरद पाटील हे दोन मुकबधीर मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 SRH vs LSG: पुरन-बिदोनीची नाबाद खेळी; हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

SCROLL FOR NEXT