Crime News: वृद्धाचा कारनामा..प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव; असं कृत्य केलं की हादरून जाल

वृद्धाचा कारनामा..प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव; असं कृत्य केलं की हादरून जाल
Crime News
Crime NewsSaam tv
Published On: 

पिंपरी– चिंचवड : विवाहबाह्य संबंधातून स्वतःच्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव रचला. याकरीता एका व्‍यक्‍तीला जीवे मारून स्‍वतःचा खुन (Crime News) झाल्‍याचा कट रचला. या प्रकरणात आळंदी पोलिसांनी दहा दिवसानंतर आरोपीस अटक केली आहे. (Maharashtra News)

Crime News
Chandrapur News: अनैतिक संबंधाचा संशय; पत्नीच्या कथित प्रियकरावर भरचौकात चाकू हल्ला

आळंदी पोलिसांनी (Police) सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५) या वृद्धास अटक केली आहे. तर जवळपास दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडात रविंद्र भिमाजी घेनंद नामक (वय ४८) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे याचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे (Pimpri Chinchwad) आपल्याला स्वतःच्या प्रेयसीसोबत लांब कुठेतरी जाऊन राहता यावे; म्हणून त्यांनी स्वतःच्या मृत्यूचा कट रचला.

शिर धडावेगळे करत मृतदेह फिरविला मशिनमध्‍ये

कट रचताना त्याने रवींद्र भिमाजी घेनंद याचा खून करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. सुभाष केरबा छबान थोरवे याने रवींद्र भिमाजी घेनंद ह्याला आपल्या शेतात नेऊन त्याचे मुंडके कोयत्याने धडापासून वेगळे केले. तसेच त्‍याला स्वतःचे कपडे घालून आणि मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून त्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आळंदी पोलिसांनी दहा दिवसानंतर केरबा छबन थोरवे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com