Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: खरिपातील साठ टक्के कापूस घरात; मात्र भाव मिळेना

खरिपातील साठ टक्के कापूस घरात; मात्र भाव मिळेना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खरिपातील सुमारे साठ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आतापर्यंत आला आहे. त्यातील काही कापूस मिळेल त्या दरात विकून शेतकऱ्यांनी दिवाळी (Diwali) साजरी केली. मात्र किमान दहा हजारांचा दर मिळावा, यासाठी शेतकरी (Farmer) हव्या त्या प्रमाणात कापूस विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. (Letest Marathi News)

जिल्ह्यात लांबलेल्या पावसाने १०९ टक्के पाउस (Rain) झाला. गतवर्षी कापसाला १३ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी (Cotton) कापसाचा पेरा ११० टक्के केला. परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले, असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे. यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख (Cotton Price) कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण केली आहे. यामुळे कपाशीचे भाव कमी झाले. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला आहे.

पंधरा टक्‍के पेरा अधिक

गतवर्षी कापसाला मिळालेला १३ हजारांपर्यंतचा दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा टक्के पेरा अधिक केला आहे. यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येणे सुरू झाले आहे. दिवाळीपर्यंत अधिक कापूस बाजारात येण्याची चिन्हे आहेत. कापसाला नऊ ते दहा हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या मागणी कमी आहे.

खंडीचे दर झाले कमी

कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळेच खंडीचे दर एक लाख दहा हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत. आगामी पंधरा दिवस तरी कापसाचे दर सात ते आठ हजार रुपये असतील. यावर काळजी म्हणून शेतकऱ्यांना कापूस थोडा थोडा करून विकावा लागेल. म्हणजे तोटाही होणार नाही व भाव वाढले तर नुकसान टळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT