Chalisgaon News NCP Saam tv
ऍग्रो वन

Chalisgaon News: कापसाला दहा हजारांपेक्षा अधिक भाव द्या मागणी; चाळीसगावला राष्ट्रवादीतर्फे निर्दशने

कापसाला दहा हजारांपेक्षा अधिक भाव द्या मागणी; चाळीसगावला राष्ट्रवादीतर्फे निर्दशने

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने शासनाने कापसाची (Cotton Price) दहा हजारांहून अधिक दराने प्रती क्‍विंटल खरेदी करावी, अशी मागणी करीत येथील (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निर्दशन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. (Breaking Marathi News)

शेतकरी बांधवांनी कापसाला भाव मिळेल, या आशेने घराघरांत कापूस साठवून ठेवला आहे. जास्त दिवस होत असल्याने त्यात पिसवा पडले असून घरातील सर्वांच्या अंगाला खाजरे सुटले आहे. ज्यामुळे दवाखाने फुल्ल झाले आहेत. कमी भावात कापूस विकून हातात काहीच येत नसल्याने शिल्लक वेचलेल्या कापसाची झाडे घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज निर्दशने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या (farmer) घरात जेव्हा कापूस येतो, तेव्हाच कापसाचे भाव गडगडतात.

शेतकऱ्याच्या घरात कापूस येण्यापूर्वी १४ ते १६ हजार रुपये प्रती क्विंटल कापसाला भाव होता. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला. त्यावेळी मात्र प्रती क्विंटल सात हजार रुपयांपर्यंतचाच भाव आला. अगोदरच अतिवृष्टी व नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचे उत्पादन कमी होत आहे. त्यात शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च व मजूर मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोजचे जगणे व पोट भरणे कठीण झाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. केंद्र सरकारने आपले आयात व निर्यात धोरण व्यवस्थित राबविल्यास शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळू शकतो. त्यामुळे कापसाला हा दर मिळावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT